पहिल्याच पावसात खेडनजीक रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक काही काळ ठप्प
खेड : पहिल्याच पावसात खेडवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. शुक्रवारी दुपारपर्यंत तापमान वाढलेले असताना अचानक पावसाला सुरुवात झाल्याने त्याची वाट पाहणार्या नागरिकांना दिलासा मिळाला. याच दरम्यान खेडहून शिवतरकडे जाणार्या रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतून काही काळ ठप्प पडली.
उकाड्याने हैराण झालेले नागरिक कधी एकदा पाऊस पडतो, याकडे नजर लावून बसले असतानाचा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणेच तापमान कमालीचे तापलेले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत आकाशात पावसाची कोणतीही चिन्हेही नव्हती. अशाच वातावरणात अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि बघता बघता पा ऊस कोसळू देखील लागला. यामुळे पाऊस सुरु होताच छत्रीशिवाय नागरिक आणि विनारेनकोट दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. मार्केटमध्ये आलेल्या काही ग्राहकांनी मिळेल तिथे आसरा घेत पावसापासून बचाव के
तालुक्यातील मुरडे समर्थनगर येथे शिवतर मार्गावर रस्त्याच्या बाजूला वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी ऊन पावसाचा खेड सुरू होता. मार्गावर कोसळलेले झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.