उत्पन्न वाढीसाठी रेल्वेचे धोरण
कोकण रेल्वेने मागवल्या निविदा
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, कोकणकन्या तसेच मडगाव- सावंतवाडी -दिवा एक्सप्रेस गाड्यांवर लवकरच जाहिराती झळकलेल्या आपल्याला दिसणार आहेत. रेल्वेने तिजोरीत भर घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे लवकरच या तिन्ही गाड्या त्यांच्या युनिक रंगसंगतीमध्ये पहायची सवय असलेल्या प्रवाशांना त्या जाहिरातींनी व्यापलेल्या पाहायला मिळणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या अनेक गाड्यांवर विविध कंपन्यांच्या जाहिराती लावण्यास सुरुवात झाली आहे. याद्वारे रेल्वेने आपल्या महसूल वाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वाधिक पसंतीच्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस तसेच मडगाव- सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या गाड्यांवर देखील लवकरच खासगी कंपन्यांच्या जाहिराती झळकलेल्या दिसणार आहेत. कोकण यासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा अर्ज मागवले आहेत. दिनांक 23 सप्टेंबर ते सात आक्टोबर या कालावधीत मांडवी कोकणकन्या तसेच सावंतवाडी एक्सप्रेस वर ज्या इच्छुक कंपन्यांना जाहिराती झळकवायच्या च्या असतील त्यांनी निविदा अर्ज भरावयाचे आहे.
दिनांक सात आक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निविदा उघडली जाणार आहे.