![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/10/FB_IMG_1665424443336.jpg)
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/10/FB_IMG_1665424429363-300x224.jpg)
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2022/10/FB_IMG_1665424421215-300x224.jpg)
माखजन : माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन प्रशालेत संस्थापक दिन नुकताच साजरा करण्यात आला. संस्थेचे प्राणवायू कै. गो.बा.नातू यांच्या स्मृतिदिनी १० ऑक्टोबर ला संस्थापक दिन साजरा करण्यात येतो. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रख्यात निवेदक,सुसंवादक निबंध कानिटकर (कसबा,संगमेश्वर)उपस्थित होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष आनंद साठे होते.
दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ढाल स्पर्धेची मानकरी यावर्षी कु वेदिका मोरे होती. तिला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व अन्य पारितोषिक वितरण सोहळा झाला.
यावेळी माजी शिक्षक श्री गोविंद आंबेटकर यांनी गीत सादर करून आद्य संस्थापकांना आदरांजली वाहिली.तर खजिनदार संदेश पोंक्षे यांनी विचार मांडले
निबंध कानिटकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा धागा पकडून मार्गदर्शन केले.आनंदजी साठे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. रुही पाटणकर,आभार दत्तारामजी गुरव,व सूत्रसंचालन गौरव पोंक्षे याने केले.