माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन येथे संस्थेतर्फे आज २६ सप्टेंबर रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील आठ दिवसात संस्थेचे दोन सभासद कै श्रीधर सदाशिव उर्फ शिरूभाऊ फणसे व कै श्रीकृष्ण कमलाकर उर्फ एम.के सर नामजोशी याना देवाज्ञा झाली.
सहा वर्ष अध्यक्ष म्हणून पंचक्रोशीची शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थेला आपल्या सक्रिय योगदानाद्वारे आर्थिक सामाजिक बळकटी आणणारे श्री श्रीधर फणसे आणि संस्थेच्या माखजन प्रशालेत गणित विषयाचे शिक्षक म्हणून विद्यार्थी प्रिय असलेले आणि नंतरच्या काळात विश्वस्त म्हणून संस्थेत सेवा बजावणारे श्री.एम.के नामजोशी सर या दोघांनाही गत आठवड्यात देवाज्ञा झाली.दोघांचेही योगदान संस्थेसाठी अनमोल होते.
दोनही गतात्म्यास सद्गती मिळण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी प्रशालेच्या गुरुदक्षिणा सभागृहात सोमवार दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.