मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना एमएससीच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरिसरात उपलब्ध आहेत.
एमएससी रसायनशास्त्र (लहशाळीीीूं) विभागासाठी एकूण 60 जागा असून ऑरगॅनिक, नेलेटीकल, फिजीकल तसेच इनऑरगॅनीक रसायनशास्त्र विषयातील स्पेशलायझेशन मध्ये प्रवेश दिला जातो.
तिन्ही विभागाची स्वातंत्र्य अशी प्रयोगशाळा आहे तसेच विद्यार्थ्यांच्या नेट आणि सेट परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी आविष्कारसारख्या संशोधन स्पर्धेत देखील विद्यार्थी सहभाग घेतात. विद्यार्थ्यांना नोकरी देखील मिळवून देण्यासाठी विविध कंपन्यां ह्या रत्नागिरी उपपरिसरात येत असतात
इच्छूक विद्यार्थ्यांनी त्वरित नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी केला आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क साधावा असे आवाहन उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केले आहे.