३० नोव्हेंबरला वाहन फेरीचे आयोजन
रत्नागिरी : शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे होणाऱ्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी निमंत्रण बैठका घेण्यात येत आहेत. या निमंत्रण बैठकांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
सभेनिमित्त बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी सायं. ४ ते ६ या वेळेत रत्नागिरी शहरात मारुती मंदिर ते आठवडा बाजार – बाजारपेठ मार्गे जयस्तंभ अशी दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यात २०० निमंत्रण बैठका नियोजित असून शहरासह अनेक गावांमध्ये वाडीवार आत्तापर्यंत १०० निमंत्रण बैठका संपन्न झाल्या आहेत. या बैठकांना मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभत असून बहुतांश बैठकांमध्ये तरुणांचा उस्फूर्त सहभाग लाभत आहे. या बैठकांमधून विविध माध्यमातून होणारे हिंदु देवतांचे आणि राष्ट्रपुरुषांचे विडंबन, लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, मंदिरांचे सरकारीकरण, हिंदूंचे संत, हिंदुत्ववादी यांच्यावर होणारी आक्रमणे आणि हत्या आदी समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून दिले जात आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजे हिंदू राष्ट्राची स्थापना होय. त्या दृष्टीने हिंदूंना जागृत करून संघटित करण्यासाठी या हिंदू राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेच्या प्रसारासाठी वैयक्तिक संपर्क तसेच गावागावांतून उद्घोषणा, सभेचे निमंत्रण देणारे फ्लेक्स फलक आदिंच्या माध्यमातूनही प्रसाराला वेग आला आहे.
या सभेनिमित्त बुधवार, ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी रत्नागिरी शहरात आयोजित केलेल्या वाहन फेरीला आणि त्यानंतर आयोजित ३ डिसेंबर रोजीच्या हिंदु राष्ट्र जागृती सभेला बहुसंख्य हिंदूंनी काळाची पावले ओळखून उपस्थित राहावे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदुत्ववादी संघटना यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी श्री. विनोद गादीकर,
हिंदू जनजागृती समिती करिता, रत्नागिरी.
संपर्क-9422050560 यांच्याशी संपर्क साधता येईल.