रत्नागिरी जिल्ह्याचा महिला लोकशाही दिन २० जूनला
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा केला जातो. दि. २० जूनला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ज्या महिलांनी लोकशाही दिनाला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांक १०७७ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांना या टोल फ्री क्रमांकावर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत त्यांची निवेदने, अर्ज नोंदविता येणार आहे. संबंधित महिलांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केले आहे. लोकशाही दिनात जिल्हास्तरीय अधिकारी महिलांनी उपस्थित केलेल्या अर्जानुसार संबंधित यंत्रणेला कार्यवाहीचे आदेश देतात. या व्यतिरिक्त टोल फ्री क्रमांकाची सुविधा देखील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन तासांच्या कालावधीत टोल फ्री क्रमांक महिलांना त्यांची निवेदने, अर्ज नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. सर्व महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.