लायन्स क्लब ऑफ उरणचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा
उरण दि 23 ( विठ्ठल ममताबादे ) :लायन्स क्लब ही सामाजिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संघटना असून 200 ही हुन जास्त देशात कार्यरत असणाऱ्या या संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम समाजात राबविले जातात. अशाच प्रकारचे उपक्रम लायन्स क्लब ऑफ उरणच्या माध्यमातून राबविण्यात आले असून लायन्स क्लब ऑफ उरणचा 50 वा वर्धापन दिन (सुर्वण महोत्सव ) साजरा करताना खूपच आनंद होत आहे.व खूप चांगले कार्य लायन्स क्लब ऑफ उरणच्या माध्यमातून सुरु आहे असे गौरवोद्गार लायन्स क्लबचे PMJF लायन राकेश चौमल (इन्स्टॉलेशन ऑफिसर) यांनी काढले.
लायन्स क्लब ऑफ उरण चा 50 वा वर्धापन दिन अर्थातच सुवर्ण महोत्सव दिनांक 21/7/2022 रोजी सांयकाळी 7.30 ते रात्री 11 या वेळेत यूईएस हायस्कूल, सरस्वती हॉल, बोरी उरण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राकेश चौमल यांनी लायन्स क्लब ऑफ उरणच्या कार्याचे, उपक्रमाचे कौतूक करत सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. लायन्स क्लब ऑफ उरणला 50 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल युईएस हायस्कूल मध्ये भव्यदिव्य असे मंडप सजविण्यात आले होते. स्टेप आर्ट ऑफ डान्स अकॅडमीच्या डान्स कलाकारांनी सुंदर नृत्य करत सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तदनंतर दिप प्रज्वलन झाले. नंतर देशाचे राष्ट्रगीत जनगणमन चे गायन झाले. लायन्स क्लब ऑफ उरणचे नविन सदस्य झालेल्या सदस्यांना यावेळी शपथ देण्यात आली.नवीन सदस्य ऍड जागृती
गायकवाड, प्रवीण थळी, अक्षता गायकवाड, संजीवनी कुथे ,नितीन कोळी,डॉ पल्लवी पाटील यांनी शपथ घेतली.तदनंतर नविन वर्षाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.लायन्स क्लब ऑफ उरणच्या प्रसिडेंट पदी एम जे एफ लायन सदानंद गायकवाड, सेक्रेटरी पदि एमजेएफ लायन डॉ. लायन साहेबराव ओहोळ,ट्रेझरर पदी लायन प्रमिला गाडे , उपाध्यक्ष पदी लायन निलिमा नारखेडे, उपाध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कोठावदे यांची निवड करण्यात आली.डॉ ला. प्रीती गाडे व ला. अक्षता गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून PMJF लायन राकेश चौमल, ला. एन आर परमेश्वरन, ला.अलोक मिश्रा, ला. निलिमा नारखेडे, ला.प्रदिप भट्टाचार्य, ला.संजय गोडसे,ला. हेमंत टेलर, विंग कमांडर महानुभाव,ला.सीमा पै,ला. उदय साखरे ,GTPS चे चीफ मॅनेजर कुमार वाल, गाडे हॉस्पिटलचे डॉ संतोष गाडे, डॉ प्रीती गाडे, डॉ नाखवा, डॉ सुरेश पाटील, डॉ वैशाली पाटील, लायन्स क्लबचे उपखजिनदार सपना गायकवाड, उपसेक्रेटरी ला. संध्या ओहोळ, ला. संजीव अग्रवाल, चार्टर मेंबर MJF ला. चंद्रकांत ठक्कर, डॉ मुकुंद भोसले, ला. समीर तेलंगे, ला. दत्तात्रेय नवाले, माजी नगराध्यक्ष अनंत गायकवाड, माजी ACP प्रदीप माने, ला. शंकर कोळी,ला. नरेश ठाकूर,ला. प्रकाश नाईक,MJF ला. धोत्रे,लिओ प्रेसिडेंट उदय रुईकर, सतीश गाडे,रायगड भूषण सीमा घरत,ला. नवीन राजपाल, ला. अवणी सरवैया, ला. राजश्री रुईकर, ला. साळुंके -गाडे,ज्येष्ठ,ला. शीतल तेलंगे,स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड, माजी सरपंच काशिनाथ गायकवाड, महिला सामाजिक कार्यकर्त्या गौरी देशपांडे, संदीप गायकवाड, ला. सदानंद गायकवाड यांच्या कुटुंबातील सदस्य आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात प्रत्येक मान्यवरांचा तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.50 वर्षाची धुरा उत्तमपणे सांभाळल्याने ला. प्रताप मुदलीयार यांचाही सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. ला. प्रताप मुदलीयार तर आभार प्रदर्शन ला. साहेबराव ओहोळ यांनी केले.
जेवणाची उत्तम व्यवस्था राकेश ठाकूर यांनी तर मंडप सजावट गुरव यांनी केले. तसेच यूईएस शाळेने हॉल उपलब्ध करून दिल्याने या सर्वांचे लायन्स क्लबच्या वतीने आभार मानण्यात आले.सदर कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ उरणचे पास्ट प्रेसिडेंट ला. नरेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ला. स्वप्ना गायकवाड यांनी तसेच लायन्स क्लबच्या सदस्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.