वशेणी येथे जनसेवा पुरस्काराचे वितरण
उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे ) : जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वशेणी गावातील सेवाभावी मान्यवरांचा विविध मान्यवरांच्या हस्ते जनसेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त मान्यवर1) अध्यात्मिक सेवा पुरस्कार शारदा केशव पाटील 2)बाल आरोग्य सेवा पुरस्कार – श्रीम.काळीबाई हरिभाऊ भोईर 3)पर्यावरण पुरस्कार- गणपत हरिश्चंद्र ठाकूर 4)पाककला जनसेवा पुरस्कार- जगन्नाथ माया पाटील 5)श्रवण भक्ती पुरस्कार- गणेश नामदेव खोत.6)शैक्षणिक क्षेत्र – अनंत अर्जुन पाटील मुख्याध्यापक रा.जि. प .शाळा वशेणी.7) कोणतेही राजकीय पद नसताना गावात विकासाची कामे आणून पायाभूत भौतिक सुविधा देऊन राजकीय सेवा केल्या बद्दल सुनिल हिराचंद ठाकूर यांनाही जनसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शाल,श्रीफळ, प्रमाणपत्र, वृक्षकुंडी,जागर तंबाखूमूक्तीचा पुस्तक आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या वेळी जि.प.शाळा वशेणीच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागत पद्य सादरीकरणात केले. गावात समाजसेवेचे मूल्य रूजवण्याच्या दृष्टिकोनातून जनसेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने केले आहे.असे मत प्रास्ताविकात मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
या वेळी माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे, वशेणी गावाचे पोलिस पाटील दिपक म्हात्रे, माजी सरपंच विजय म्हात्रे,ग्रामपंचायत सदस्य गणपत ठाकूर, पेण पतपेढी संचालक हितेंद्र म्हात्रे, जेष्ठ नागरिक गिरीश पाटील, एकनाथ म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, बळीराम म्हात्रे, यशवंत ठाकूर, हरेश्वर पाटील, कुंजवी म्हात्रे आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. या वेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून दंडेश्वर परीसर पाणी साठवण टाकीची स्वच्छता व दुरूस्ती करण्यात आली. तर सुकंन्या प्रवास सवलत योजने अंतर्गत प्रत्येकी 500 रू रोख 11 वीतील सहा मुलींना देण्यात आले. आभार प्रदर्शन बी.जे.म्हात्रे यांनी केले.