संजय होळकर गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित
उरण (विठ्ठल ममताबादे ) : पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 जून 2022 रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार भव्य दिमाखदार सोहळा वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यातील सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, पत्रकारिता, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव व पत्रकार उत्कर्ष समिती वार्षिक स्मरणिकेचे व रायगड दर्पण साप्ताहिक आणि पाताळगंगा टाईम्स साप्ताहिकांचे प्रकाशन रायगड जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक व मोठिजुई शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक संजय होळकर गुरुजी यांना सन्माननीय पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्या शुभहस्ते पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार 2022 शाल,सन्मानपत्र, सुंदर ट्रॉफी व तुळशीचे रोप देऊन प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, डॉक्टर सुहास माने जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग, व्ही. एस. म्हात्रे माजी सचिव महाराष्ट्र राज्य, भावनाताई घाणेकर महिला आघाडी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,श्रीम. उमाताई मुंडे माजी महिला व बालकल्याण सभापती,इंडियन आयडॉल सागर म्हात्रे,यु ट्यूब फेम अनघा कडू,अविरत चित्रपट निर्माते दिग्दर्शक मिलिंद म्हात्रे अविरत टीम उरण, आदर्श शाळा मोठीजुई शिक्षक वृंद,राजेंद्र होळकर,कल्पेश माने,सर्व होळकर परिवार,संगिता माने,श्रीम.सरिता निकम,पत्रकार उत्कर्ष समिती महिला अध्यक्ष स्मिता पाटील व पदाधिकारी सदस्य यांच्यासह डॉ. अशोक म्हात्रे अध्यक्ष,सचिव वैभव पाटील, उपाध्यक्ष राकेश खराडे व सर्व पत्रकार सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्मिता पाटील तर उत्कृष्ट समालोचन नितेश पंडित यांनी केले. राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे शिक्षक संजय होळकर यांचे विविध स्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.