सिंगापूरच्या कंपनीचे तेलवाहू बार्ज जयगडजवळ खोल समुद्रात उलटले
रत्नागिरी : सिंगापूरमधील एका कंपनीचे तेलवाहू बार्ज जयगडजवळील खोल समुद्रात उलटले आहे. या घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलाने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग मधील सर्व सागरी पोलीस ठाण्यांनासतर्क केले आहे.
दिनांक 17 जुलै 2022 रोजी रत्नागिरी तालुक्यातील जयगड जवळील खोल समुद्रामध्ये सिंगापूरमधील कंपनीचे तेलवाहू बार्ज उलटले आहे. यामुळे या बार्ज मधील तेल तसेच इतर वस्तू किनार्यावर वाहून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग मधील किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना यामुळे सतर्क करण्यात आले आहे. किनाऱ्यावर वाहून आलेल्या कोणत्याही वस्तूला हात न लावण्याचे आवाहन तटरक्षक दलाकडून करण्यात आले आहे.
किनाऱ्यावर नागरिकांना कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने जवळच्या सागरी पोलिस ठाण्याला सूचित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व घटनेवर भारतीय तटरक्षक दलाने सतर्कता बाळगली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पडवे, कुडली, काताळे, वेळणेश्वर, कोंड कारुळ, बोऱ्या, बुधल येथील मच्छीमारानी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.