सेंट्रल गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर’ (UPSC) परीक्षेत परीक्षेत शहापूरची भाविका उमवणे देशात दुसरी
महाराष्ट्रातून तिच्या बॅचला परीक्षा देणारी भाविका एकमेव
ठाणे : जिल्ह्यातील शहापूरची सुकन्या कु. भाविका उमवणे ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘सेंट्रल गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर’ (UPSC) परीक्षेत लेखी 1000 पैकी 913 व तोंडी परीक्षेत 1000 पैकी 896 गुण मिळवून देशात दुसरी आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील कु. भाविका उमवणे ही अत्यंत खडतर परिस्थितीत अभ्यास करून देशात द्वितीय आली आहे. पुढील प्रशिक्षणा करिता केंद्र शासनाचे प्रशिक्षण केंद्र मसुरी येथे दाखल झाली असून तिची पोस्टिंग भुवनेश्वर येथे झाली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातून ती एकटीच परीक्षेला बसली होती. लेखी व तोंडी अशा दोन्ही परीक्षेत चांगल्या मार्क्स ने ती उत्तीर्ण झाली आहे. आजच्या युवा पिढीने तिचा आदर्श नक्कीच जोपासायला हवाय. आम्हाला संधी मिळाली की, आम्ही तिचं सोनं करतो हे तिने दाखवून दिले आहे.
Post: Head Research Scientist (Health officer)
Exam: Lateral entry in healthcare and hospital management (UPSC)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील कु. भाविकाच्या यशाबद्दल कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई कुणबी युवा मुंबई तसेच कुणबी युवा चिपळूणकडून तिचे अभिनंदन करण्यात आले.