सीआरझेडच्या मर्यादा शिथिल झाल्याने कोकणात पर्यटन व्यवसायाला मिळणार उभारी!
रत्नागिरी : सागरी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) मर्यादा शिथिल करून नियंत्रण हद्द ५० मीटर करण्याच्या अंतिम आराखड्याला राष्ट्रीय सागरी हद्द प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सागरी किनार्याजवळील रोजगार निर्मितीच्या माध्यमातून उभारणार्या स्थानिक पर्यटन विकासाला फायदा होणार आहे.
या निर्णयामुळेे कोकणातील किनारी जिल्ह्याबरोबरच किनारी गावांनाही दिलासा मिळणार आहे. कोकणात विस्तीर्ण आणि समृद्ध सागरी किनारे आहेत. गोव्याच्या धर्तीवर येथेही पर्यटन व्यवसायातून स्थानिकांना रोजगारांची संधी उपलब्ध होणार आहे.