उरण दि 26(विठ्ठल ममताबादे ) : 25 सप्टेंबर हुतात्मा नाग्या दादा महादू कातकरी यांना अभिवादन करण्यासाठी अक्का देवीच्या माळरानावर रायगड जिल्ह्यातील जनजाती समाज एकत्र आला होता. कार्यक्रमाला वनवासी कल्याण आश्रम राष्ट्रीय मार्गदर्शक सोमय्याजी जुलू , प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार , सुदाम पवार जनजाती सुरक्षा मंच जिल्हा संयोजक, वसंत भाऊ पाटील चिरनेर जंगल सत्याग्रह अभ्यासक, ॲड. परशुराम पवार प्रांत हित रक्षा प्रमुख व आश्रम जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ वाघे यांनी केले.
सोमय्या यांनी आपल्या भाषणामध्ये संपूर्ण जंगलातील समाज या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथील संस्कृतीसाठी कशा पद्धतीने लढला याची माहिती दिली तसेच आज भारताची संस्कृती टिकून राहण्यासाठी जनजाती समाजाचे मुख्य योगदान राहिले आहे.
ठमाताई यांनी वनवासी कल्याण आश्रम गेले नऊ दशके जनजाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विवीध क्षेत्रात काम करत आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हुतात्मा नाग्या दादा याचे पूर्ण कृती पुतळा याच जंगलामध्ये उभा करून दाखवून दिले आहे. शिक्षा हित रक्षा आणि श्रद्धा यांसारख्या विविध आयामानच्या आधारे आज समाजाची सेवा संस्थेच्या माध्यमातून होत आहे.
प्रमुख वक्ते एडवोकेट परशुराम पवार यांनी आपला समाज पुढे येण्यासाठी आपणच आता चार पावला पुढे यावं लागणार आहेत शिकून कायदे समजून घेऊन आपल्या हिताच्या बाबी समजून घेऊन आपल्याला मिळवाव्या लागतील. वनहक्क कायद्याच्या आधारे जंगलातील असलेल्या वनौषधी यांची वाढ करून येथील साधन संपत्तीचा योग्य प्रकारे उपयोग करून आपली आर्थिक शैक्षणिक व सामाजिक सुधारणा करता येऊ शकते हे स्पष्ट केले.
या प्रसंगी हुतात्मा नाग्या कातकरी यांचे वंशज विश्वनाथ नाईक यांचा स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट डे चे औचित्य साधून उरण तालुका केमिस्ट असोसिएशन च्या वतीने उपस्थित बांधवाना औषधें सेवन माहिती देण्यात आली व पोटातील कृमी नाशक औषधाचे वाटप करण्यात आले.फार्मासिस्ट उमाकांत पानसरे,फा.बाळू घालवत फा दिलीप ठाकूर , फा बळीराम पेनकर ,फा विश्वनाथ पाटील , मदनगिरी उपस्थित होते.
सारसोई आदिवासी वाडी येथून अक्कदेवी वाडी पर्यंत 150 युवक कृष्णा काळ्या वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल यात्रा घेऊन आले होते.
शेवटी वनवासी बांधवांनी पारंपारिक नाच गाण्यातून हुतात्मा नाग्या कातकरीचे गुणगान गाऊन अनोखी आदरांजली वाहिली. रमेश फोफेरकर यांनी आमदार महेशशेठ बालदि यांचे उरण ,पनवेल खालापूर येथील वनवासी बांधवांसाठी वाड्यांवर फिरता दवाखाना उपलब्ध करून दिल्या बद्दल विशेष आभार मानले.कार्यक्रमासाठी, जिल्हा सचिव रवींद्र पाटील, कुणाल सिसोदिया मिरताई पाटील , अजित भिंडे, विश्वनाथ नाईक, बेबीताई कातकरी,दीपक गोरे,सुनंदा कातकरी , वामन म्हात्रे यांनी मेहनत घेतली. सुमारे 700 ते 800 आदिवासी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
हुतात्मा नाग्या दादा महादू कातकरी यांना अभिवादन
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |
Prev Post