लांजा : तालुक्यातील 128 महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार देऊन 31 मे रोजी 64 ग्रामपंचायतीमध्ये गौरविण्यात येणार असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी लांजा श्री. राजेश जुगाडकर यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ग्रामीण भागात महिला, बाल विकास सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात अहिल्यादेवी सम्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम 500, शाल श्रीफळ असे सन्मान स्वरूप आहे 27 मे पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात महिला कार्यकर्ते यानी अर्ज सादर करावयाचे होते.
दि.29 मे पर्यंत सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने निवड करून त्या दोन महिलांची सन्मान सोहळयासाठी निमंत्रित करावयाचे आहे या निवड समितीत सरपंच, ग्रामसेवक,पोलीस पाटील, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका अशी समिती आहे नारी शक्तीचा सन्मान करण्याची ही योजना प्रेरणादायी असल्याचं सांगून ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाला बळ देणारी बाब असल्याचे महिला दक्षता समिती अध्यक्ष श्रीमती स्वपना सावंत यांनी सांगितले.