रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर देखभालीच्या कामासाठी शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर २०२३ रोजी पुन्हा एकदा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मंगळवारी संगमेश्वर ते रत्नागिरी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. आता शुक्रवारी कुमठा ते कुमटा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटक मध्ये कुमठा ते कुंदापुरा सेक्शन च्या दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी दुपारी १ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून दहा मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
या गाड्यांचे वेळापत्रक बिघडणार
या मेगाब्लॉकमुळे वेरावल ते तिरुअनंतपुरमदरम्यान धावणारी (16333 ) एक्सप्रेस गाडी ( दिनांक 31 ऑगस्ट रोजी प्रवास सुरू होणारी) रोहा ते कुमटा दरम्यान तीन तास थांबवून ठेवली जाणार आहे.
या गाडीबरोबरच मंगळूरु सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी (12620) मत्स्यगंधा एक्सप्रेस ( दिनांक 1 सप्टेंबर रोजी प्रवास सुरू होणारी ) सुरतकल ते कुंदापुरा स्थानकादरम्यान दीड तास थांबवून ठेवली जाणार आहे.