उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) : दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास उरण चार फाटा येथे उरण वाहतुकीचे पोलीस नाईक दयानंद राठोड वय (३५) हे कर्तव्य बजावत असताना राहुल नामक एका व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे
वाहतूक पोलीस राठोड हे कर्तव्य बजावत असताना एक अज्ञात इसम येऊन उभा राहिला, व त्यांना हातवारे करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावर दयानंद राठोड यांनी त्याला कोणाला शिवीगाळ करतो असे विचारले असता, अजून अश्लील भाषेत शिवीगाळ करून थांब माझ्या आईला बोलवतो मग मी तुला दाखवतो मी कोण आहे.असे म्हणत घरी गेला व काही काळाने आपली आई , बायको व दोन महिलांना सोबत घेऊन आला व कर्तव्य बजावत असलेले उरण वाहतुकीचे पोलीस नाईक दयानंद राठोड यांना सदरच्या इसमाने अंगातील शर्ट काढून परत शिवीगाळ करून गळपट्टी धरून धक्काबुक्की करून मारहाण केली .
या मारहाणहीत पोलीस नाईक दयानंद राठोड यांना दुखापत झालेली असून आरोपीवर सरकारी कामात अडथळा तसेच सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, ५०४,५०६ अन्वये उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या इसमाचे नाव राहुल असे आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे हे पुढील अधिक तपास करीत आहेत.