शहरातील कोत्रेवाडी येथील घटना
लांजा : लांजा शहरात बिबट्याच्या पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. लांजा कोत्रेवाडी येथील सुहास सुरेश वेद्रे यांच्या मालकीच्या गाईंचे वासरू सोमवारी रात्रीच्या सुमारास रात्री बिबट्याने हल्ला करून मारले आहे.
तालुक्यातील धुंदरे वैभव वसाहत, स्वामी स्वरूपानंद नगर या ठिकाणीं रात्री वेळी बिबट्याचे मुक्त संचार असतो. पाळीव कुत्रे मांजर यांना बिबट्या काढून भक्ष्य केले आहे. वनाधिकारी यांनी शहरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.