उरण (विठ्ठल ममताबादे ) : शहरांमध्ये फक्त सुशोभिकरणच नव्हे तर सातत्याने स्वच्छताही आवश्यक आहे. प्रशासनाने शहरांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील विविध नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मागील महिन्या प्रमाणे उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात उरण शहरातील तहसील कार्यालय परिसर ते मशीद मोहल्ला ते महात्मा गांधी पुतळा ते वाणी आळी या परिसरात साफसफाई करण्यात आली.
या अभियानात एकूण ४ टन कचरा उचलण्यात आला.हे अभियान राहुल मुंडके उपविभागीय अधिकारी पनवेल , तहसीलदार उद्धव कदम तसेच उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखापाल सुरेश पोसतांडेल, नगररचनाकार सचिन भानुसे, बांधकाम अभियंता झुंबर माने, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगर सेवक कौशिक शहा, प्रसाद मांडेलकर यांचे श्रमदानातून पार पडले.
उरण नगर परिषद शाळा क्र. १,२,३ चे शिक्षक तसेच विद्यार्थी, माय नॉलेजचे विद्यार्थी यांनी सदर अभियानात भाग घेऊन श्रमदान केले. या स्वच्छता अभियानामुळे उरण शहर स्वच्छ होण्यास नक्की मदत होईल.