https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मुंबई-गोवा महामार्गाच्या काँक्रिटकरणाचे उद्या ना. नितीन गडकरींच्या हस्ते भूमिपूजन

0 60

राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 आणि 965 च्या काँक्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा

अलिबाग : कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू, राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाड गाव, ता. पनवेल येथे गुरुवार, दि. 30 मार्च 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता संपन्न होणार आहे.

या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य सर्वश्री आमदार जयंत पाटील, निरंजन डावखरे, श्री.अनिकेत तटकरे, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य आमदार भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, श्रीमती आदिती तटकरे, महेंद्र थोरवे, श्री. महेश बालदी, महेंद्र दळवी यांची उपस्थिती राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.