https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

शासकीय योजनांची कामे वेळेत मार्गी लावावीत : खा. विनायक राऊत

0 57

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक संपन्न

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक अध्यक्ष खासदार विनायक राऊत आणि सहअध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे संपन्न झाली.


यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत यांनी शासनाच्या योजनांचे काम वेळेत पूर्ण करा. पाणीपुरवठा संदर्भातील योजनांची कामे तात्काळ मार्गी लावा. संगमेश्वर निवळी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. महिलांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना आवश्यक ती मदत करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


या बैठकीत खासदार विनायक राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती), ई-अभिलेख, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवाज योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आदी योजनांचा आढावा घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.