रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या नाटेकर, गांधी, कीर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. सौ. दीपिका कुळकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमा जांगिड या विद्यार्थीनीने केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वर्षा जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहल शिंदे या विद्यार्थीनीने लोकमान्य टिळक यांचा परिचय, बालपण आणि त्यांचे कार्य याबाबत माहिती दिली. रिद्धी नागवेकर या विद्यार्थीनीने अण्णाभाऊ साठे यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. रुही नाटेकर हिने मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात सौ. शुभांगी शिंदे यांनी टिळक कसे घडले आणि त्यांचे विचार याविषयी माहिती दिली.
शिवानी पाटील हिने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी पटवर्धन या विद्यार्थिनीने केले. ईशस्तवन व स्वागत गीतासाठी सर्वेश हातफले व विश्वंभर बारगोडे यांनी तबला व पेटीची साथ दिली.