मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी शाखेचा उपक्रम
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या रक्ताचा तुटवडा असून रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी मराठी पत्रकार परिषदेने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांसह विशेषतः तरुण रक्तदात्यांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली.
अत्यंत कमी असलेला रक्तसाठा आणि त्यामुळे विविध तालुक्यातून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची परवड थांबवण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घेतला आहे. रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्यावतीने पुढाकार घेऊन शनिवारी ४० हुन अधिक लोकांनी रक्तदान केले.
शिबिराचा शुभारंभ प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनी उपस्थित राहून मराठी पत्रकार परिषदेने सामाजिक बांधिलकी जपली म्हणून आभार मानले, असे उपक्रम सामाजिक संस्थांकडून वगैरे राबवले जात असतातच मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून मराठी पत्रकार परिषद सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करून रुग्णांना जीवदान देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे यावेळी डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.
या रक्तदान शिबीरात महिला वर्गानी देखील सहभाग घेऊन रक्तदान केले.
या शिबिराला मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, कोकण संघटक हेमंत वणजू, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष प्रशांत पवार, उपाध्यक्ष प्रणव पोळेकर, अमोल मोरे, सतीश पालकर, प्रसिद्धी प्रमुख जमीर खलफे, प्रशांत हरचेकर, संजय पंडित, सौरभ मलुष्टे, रहीम दलाल, सचिन बोरकर, श्रीहरी तांबट, अमोल डोंगरे , सिद्धेश मराठे आदी उपस्थित होते, या उपक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोहेल मुकादम, सचिन शिंदे, राहुल पवार यांनी सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केला.