रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची इस्रो सफर!
रत्नागिरी : शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाशाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, तसेच अवकाश संशोधनाची गोडी लागावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवण्यात आली. प्रशालेतील शिक्षकांनीही या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला होता.
बेंगळुरु येथील इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) या अवकाश संशोधन संस्थेच्या
स्थापनेपासूनचा इतिहास, आजपर्यंत केलेल्या अवकाश संशोधन मोहिमा, संस्थांमध्ये संशोधन कसे केले जाते? शास्त्रज्ञ कसे काम करतात? अवकाश संशोधनात करिअर कसे करावे? त्यासाठी शिक्षण आणि विविध परीक्षा आदींबाबतची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
रविवार दि. 17 रोजी सुरू झालेल्या या अभ्यास दौऱ्यात पद्मनाभ मंदिर दर्शन, नेय्यर वन्यजीव अभयारण्य व धरण, त्रिवेंद्रम पॅलेस, त्रिवेंद्रम प्राणी संग्रहालय, आर्ट गॅलरी यांना भेट देण्यात आली. 20 रोजी रॉकेट लाँचिंग व सायन्स म्युझियम भेट, सुचिंद्रम मंदिर भेट तर 21 रोजी स्वामी विवेकानंद मेमोरियल दर्शन, कन्याकुमारी देवी दर्शन घेण्यात आले.
या उपक्रमासाठी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब परुळेकर यांची प्रेरणा मिळाली. संस्थेच्या सचिव ॲड. सुमिता भावे, सीईओ दाक्षायणी बोपर्डीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. या अभ्यास दौऱ्याचे आयोजन फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर यांनी केले होते. दिलीप भातडे, लक्ष्मण सावर्डेकर, मंदार सावंत, इंद्रसिंग वळवी, संदीप आखाडे, दत्तात्रय बनगर, पूर्वा जाधव, निवेदिता कोपरकर या शिक्षकांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला होता.