राज्यपाल रमेश बैस यांच्यासह कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित राहणार
रत्नागिरी दि. १४ : दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 41 व पदवीदान सोहळा दिनांक 15 मार्च २०२३ रोजी आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्यासह राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.
दापोलीतील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या निमित्ताने महामहीम राज्यपाल रमेश बैस हे प्रथमच दापोलीच्या दौऱ्यावर येत आहेत.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 15 मार्च 2023 रोजी सकाळी 09.10 वाजता राजभवन हेलिपॅड येथून महामहिम राज्यपाल महोदयांसमवेत हेलिकॉप्टरने दापोली जि. रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील हेलिपॅडवर आगमन.सकाळी 10.05 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील हेलिपॅड येथून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
सकाळी 10.10 वाजता शासकीय विश्रामगृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे आगमन व राखीव.
सकाळी 10.30 वाजता महामहिम राज्यपाल महोदयांसमवेत कृषी प्रदर्शनास भेट. सकाळी 11.00 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४१ व्या पदवीदान समारंभास उपस्थिती.
दुपारी 01.30 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 01.35 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील हेलिपॅड येथे आगमन.
दुपारी 01.40 वाजता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील हेलिपॅड येथून महामहिम राज्यपाल महोदयांसमवेत हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.