https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेच्या तिजोरीत ६.४८ लाखांचे उत्पन्न!

0 68

रत्नागिरी : मुंबई मडगाव अशी कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला या मार्गावरील प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 27 जून रोजीच्या उद्घाटन फेरीनंतर आज 28 रोजी पहिल्याच नियमित फेरीतून मध्य रेल्वेला सहा लाख 48 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिनांक 28 रोजी झालेल्या पहिल्या फेरीला प्रवाशांकडून उत्साही प्रतिसाद लाभला. एकूण 5030 आसनांपैकी 477 इतक्या आसनांचे म्हणजे 90 इतके आरक्षण झाले. प्रवाशांकडून पहिल्याच दिवशी लाभलेला हा प्रतिसाद रेल्वेसाठी उत्साहवर्धक ठरला आहे.

गणेशोत्सवासाठी झाले तब्बल 110 टक्के ऍडव्हान्स बुकिंग


गणेशोत्सवात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येत असल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस चे आरक्षण खुले होताच बुधवारपर्यंत गणेशोत्सव कालावधीतील दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 20 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसकरिता तब्बल 110 टक्के इतके आरक्षण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : Konkan Railway | वंदे भारत एक्सप्रेसचे रत्नागिरी स्थानकावर जल्लोषात स्वागत

Leave A Reply

Your email address will not be published.