एका सुवर्ण पदकासह एक रौप्य व सहा कास्य पदके
रत्नागिरी : एन बी नवले अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव, सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 35 व्या राज्यस्तरीय कॅडेट जुनियर व सीनियर किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यानी पदक प्राप्त केले आहेत.
या स्पर्धेत ७-९ वर्ष मुले वयोगटात पॉइंन्ट फाईट प्रकारात 28 किलो वरील वजन गटात शिवम सिंग – कास्यपदक तसेच मुलींमध्ये 28 किलो वरील वजन गटात अस्मी नाईक – रौप्य पदक, 10 ते 12 वर्षे वयोगटात 47 किलो वरील वजन गटात दिग्विजय चौगुले – कांस्यपदक मुलींमध्ये 28 किलो खालील वजन गटात पूर्वी शिंदे -कांस्यपदक, 37 किलो खालील वजन गटात तेजश्री चौगुले – कांस्यपदक, 47 किलो वरील वजन गटात श्रावणी गुरव – कास्य पदक, लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात मुलांमध्ये 37 किलो खालील वजन गटात खुशियाल गुप्ता – कांस्यपदक, 19 ते 35 वर्षे वयोगटात महिलांमध्ये पॉइंट फाईट प्रकारात 70 किलो खालील वजन गटात स्वप्नाली पवार – सुवर्णपदक प्राप्त केले ल.
या नवनिर्माणच्या आराध्य मनोरकर व मुस्कान इस्लाम यांनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करीत रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व केले. या सर्वांना शाळेच्या क्रीडाशिक्षक स्वप्नाली पवार मोलाचे मार्गदर्शन लाभलें. त्यांची पंच म्हणून निवड झाली.