रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन रत्नागिरी विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह साजरा करण्यात आला.
यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापदिनाचे औचित्य साधून पक्ष कार्यालय येथे सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने उपास्थित असणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वरिष्ठांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, देशाच्या संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार घालून अभिवादन करण्यात आले.
पक्षाच्या वतीने आशादीप शाळेत धान्य व फळांचे वाटप करण्यात आले. पक्षाच्या वरिष्ठांकडून शहरातील कोकणनगर कार्यालयात भेट देण्यात आली व जनतेसाठी कामे होत असल्याची पाहून समाधान व्यक्त करण्यात आले. कर्ला येथील आरोग्य शिबिराला भेट देण्यात आली.
यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते कुमार शेट्ये, बशीर मूर्तुझा, अभिजित हेगशेठ्ये , सौ.नसीमा डोगरकर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, मा. नगरअध्यक्ष मिलींद किर, शहर अध्यक्ष नीलेश भोसले, जिल्हा युवक कार्याध्यक्ष नौसीन काझी, जिल्हा विद्यार्थीअध्यक्ष शसंकेत कदम, तालुका अध्यशा सौ.शमीम नाईक, श्री. दरबार, बबन आंबेकर, शहर अध्यक्ष सौ. नेहालि नागवेकर, युवक शहर अध्यक्ष मंदार नैकर, युवक उपतालुका अध्यक्ष सुकेश शिवलकर, शहर अध्यक्ष अल्फसंक्याक सेल सौ. सायमा काझी, उपतालुका अध्यक्ष प्रदीप सुर्वे, मिरकरवाडा प्रभाग अध्यक्ष सौ. फरझाना मस्तान, निहाल झपडेकर, शमतीन बावानी, सौ. आलिया मजगावकर तसेच पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक बहुसंख्येन उपास्थित होते.