कुवारबाव येथे महिला दिनानिमित्त आयोजित ‘खेळ पैठणी’चा उत्साहात संपन्न
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image-190745261-16787752616685103017038933333363.jpg)
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image-1205591045-16787753402496871719848705729511.jpg)
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image416949917-16787753574582345377820407967918.jpg)
रत्नागिरी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ८ मार्च २०२३ रोजी कुवारबाव रत्नागिरी येथे महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब व माजी आमदार बाळासाहेब माने, आणि कुसुमताई अभ्यंकर पथसंस्था रत्नागिरी यांनी आयोजन केले होते. या खेळासाठी 100 महिलांनी सहभाग घेतला होता. या खेळात अंतिम विजेत्या म्हणून सौ. रसिका अमित पाडळकर यांना मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेचे उदघाटन सौ. माधवी सुरेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले तर या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार बाळासाहेब माने, सौ. माधवी माने, श्रीमती तेजा मुळे संचालिका कुसुमताई पथसंथा, सतेज नलावडे, धनंजय जोशी, दीपक आपटे आदी उपस्थित होते.
यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून कुवारबाव व परिसरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 5 महिलांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.1) श्रीम. भारती जोशी.2) श्रीम.धनश्री पलांडे,3) कुमारी अपेक्षा सुतार, 4) सौ.आदिती भावे, 5) सौ राजश्री भाटये. या महिलांना सन्मान चिन्ह, शाल व चांदीचे फुल देऊन सौ. माधवी माने यांच्या हस्ते कुसुमताई अभ्यंकर पुरस्काराने गौरवण्यात आले.
खेळ पैठणीचा कार्क्रमात अंतिम विजेती ठरली सौ. रसिका अमित पाडळकर. त्यांना मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले तर उपविजेती ठरली सौ. आरती लखन पावसकर यांना चांदीचा कुंकवाचा करंडा देऊन गौवरवण्यात आले.
भाजपा नेते माजी आमदार बाळासाहेब माने व सौ. माधवी माने यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ. अनुश्री आपटे, सौ.विक्रांती केळकर, सरपंच सौ.मंजिरी पडाळकर, कुमारी राखी केळकर,आणि सौ.नेहा आपकरे आदी महिलांनी खूप मेहनत घेतली.
याचबरोबर दि. 07/03/2023 रोजी पाककला स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी परीक्षक म्हणून आम्ही सारे खवय्ये फेम सौ. आदिती राजेंद्र भावे यांची उपस्थिती लाभली. वरी (भगर) पासून गोड पदार्थ बनवणे त्यामध्ये प्रथम क्रमांक सौ. पूनम काटकर द्वितीय क्रमांक सौ. साक्षी पाटील व तृतीय क्रमांक सौ. प्रज्ञा फडके यांनी पटकावला. पारितोषिक वितरण समारंभात प्रत्येक स्पर्धकाला आयोजकांनी सहभागाबद्दल भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले.