अहमदाबाद : भारताच्या चांद्र मोहीम 3 अंतर्गत चंद्रावर उतरलेल्या विक्रम लँडरचे चंद्रपृष्ठावर संशोधन भ्रमंती करणाऱ्या प्रज्ञान रोव्हरने त्याला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या विक्रम लंडनचे छायाचित्र घेऊन ते पृथ्वीवर धाडले आहेत. इसरो मार्फत प्रसारित करण्यात आलेल्या या छायाचित्राला भारताच्या चांद्र मोहिमेबाबत उत्सुकता असलेल्या जगभरातल्या जिज्ञासू मंडळींनी मोठी पसंती दर्शवली आहे.
प्रज्ञान रोव्हरने आजच सकाळी विक्रम लँडरचे छायाचित्र घेऊन पृथ्वीवर पाठवले. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने हे छायाचित्र प्रसारित करताच सोशल मीडियावर ते प्रचंड प्रमाणात वायरल झाले. या मोहिमेद्वारे भारताने चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवल्यापासून जगभरातून या मोहिमे संदर्भात इस्रो कडून प्रसारित होणारी होणारी अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी अंतराळ जिज्ञासू मंडळींकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.