रत्नागिरी : चिपळूण-रत्नागिरी मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार चिपळूण-मर्यादित-रत्नागिरी या बसफेऱ्या दिनांक १६ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तरी या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीकडून करण्यात येत आहे.
मर्यादित थांबे घेणाऱ्या बस फेऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे
सकाळी ०७.१५ चिपळूणमर्यादित थांबे रत्नागिरी, सकाळी ०८.०० चिपळूण मर्यादित थांबे रत्नागिरी, दुपारी २ वाजता चिपळूण मर्यादित थांबे रत्नागिरी, दु. १४.३० चिपळूण मर्यादित थांबे रत्नागिरी, सकाळी १०.१५ रत्नागिरी चिपळूण बोरीवली, सकाळी ११.१५ रत्नागिरी- चिपळूण- स्वारगेट पुणे, सायंकाळी ५.१५ रत्नागिरी मर्यादित थांबे चिपळूण, सायंकाळी ५.४५ रत्नागिरी मर्यादित थांबे चिपळूण.