लांजा : राजापूर मंदरुळ गावची सुकन्या तेजस्विनी आचरेकर यांची विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाली आहे.
सातवी राष्ट्रीय कॅडेट क्युरोगी व पूमसे चॅम्पियनशिप स्पर्धा आंध्र प्रदेशातील विशाखपट्टणम येथे दि. १ ते ४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
या स्पर्धेकरिता लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो या खेळाच्या राष्ट्रीय पंच म्हणून तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
तेजस्विनी या मंदरुळ गावच्या कन्या असून त्या सध्या लांजा तालुका येथे वास्तव्यास असून तायक्वॉंदो या खेळाच्या प्रमुख प्रशिक्षिका आहेत. त्यांनी लांजा तालुक्यातील विविध ग्रामीण भागात तसेच लांजा शहरातील गोंडे सखल रोड, एकनाथ राणे स्कूल, डी.जे सामंत इंग्लीश मिडीयम स्कूल, विद्यानिकेतन स्कूल देवधे या सर्व शाळांमध्ये तायक्वॉंदो तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाच्या अंतर्गत चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
याचबरोबर त्या त्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिद्धा प्रशिक्षिकाही आहेत. त्या अंतर्गत त्या नेहमी महिला व मुलींना स्वतःचे स्वसंरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण देत असतात. त्या स्वतः राष्ट्रीय, राज्य, जिल्हास्तरावर त्यांनी अनेक पदके मिळवली आहेत. या आधी त्यांना सामाजिक शेत्रात व क्रीडा शेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर पंच म्हणून निवड केली आली आहे.
तेजस्विनी आचरेकर यांना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, सेक्रेटरी मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, धुळीचंद मेश्राम खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, लांजा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिराज नेवरेकर, तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडिज, सहसचिव अनुजा कांबळे, कोषाध्यक्ष तेजस पावसकर, सदस्य रोहित कांबळे, लांजाचे नगराध्यक्ष मनोज बाईत, नगरसेवक संजय यादव, भाजपचे लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, कोर्ले ग्रामपंचायत ग्रामसेवक तेजस वडवलकर, मंदरुळ गावचे गावप्रमुख परशुराम मासये व समस्त लांजा-राजापूरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.