३ ऑक्टोबरपर्यंतच्या फेऱ्यांचे वेटिंग लिस्टवरील बुकिंग सुरु
रत्नागिरी : पुढील महिन्यातदि. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी आणि गेल्याच महिन्यात सुरू झालेली वंदे भरत एक्सप्रेस आत्ताच फुल झाली आहे. गणेशोत्सव कालावधीतील या आलिशान गाडीच्या फेऱ्या हाऊस फुल्ल धावणार आहेत.
पुढील महिन्यात 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. दिनांक २३ सप्टेंबर २०२३ रोजी गौरी विसर्जन होणार आहे. यासाठी वंदे भारत एक्सप्रेसच्या मुंबई- मडगाव तसेच मडगाव मुंबई अशा अप आणि डाऊन मिळून दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या नऊ फेऱ्यांचे आरक्षण आत्ताच फुल झाले आहेत. या नऊ फेऱ्यांसाठी सध्या प्रतीक्षा यादीवरील आरक्षण सुरू आहे.
हेही वाचा : Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!