रत्नागिरी : नाणीज संस्थानमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाली येथील हेलिपॅड वर स्वागत करण्यात आले.
रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनीही पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते.