उरण जांभूळपाडा कातकरीवाडी येथील दुर्घटना
उरण दि 12(विठ्ठल ममताबादे ) : जांभूळ पाडा कातकरीवाडी, उरण, जिल्हा रायगड येथील
राम कातकरी याचा अतिवृष्टीमुळे अंगावर घर कोसळून मृत्यु झाला आहे. आणि त्याच्या पत्नीला हाता पायाला दुखापत झाल्याचे तेथील कातकरी समाजाच्या आशा वर्कर सुशीला नाईक यांनी माहिती दिली. तहसीलदार आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाले आहे.
आशा वर्कर सुशीला नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11/7/2022 रोजी उरण तालुक्यात जोरात, मुसळधार पाऊस पडत होता. वादळवाराही जोरात सुरु होता. त्यातच रात्री 2 वाजता आदिवासी वाडीतील घर कोसळून राम कातकरी याचा मृत्यू झाला आहे.4 मुले, आई वडील व नवरा बायको असा त्यांचा कुटुंब आहे.तरी पीडित कुटुंबाला शासकीय मदत निधी मिळावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी केली आहे.