कोकण रेल्वे मार्गे धावणार्या हापा -मडगाव एक्स्प्रेसला 31 पासून जादा डबा
गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे रेल्वेचा निर्णय
रत्नाागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणार्या हापा- मडगाव एक्स्प्रेसला देखील स्लीपर श्रेणीचा अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. दि. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 या कालावधीत या गाडीला एक जादा डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांना वाढती मागणी आहे. जादा गाड्या तसेच इतर अनेक गाड्यांना जादा डबे जोडून देखील अनेकांना कन्फर्म रेल्वे तिकिटे मिळणे मुश्कील झाल्याने हापा ते मडगाव (22908/22907) मार्गावर धावणार्या नियमित एकस्प्रेस गाडीला देखील स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढवण्यात आला आह
या मार्गावर प्रवाशांची गाड्यांना मागणी वाढल्याने हा बदल तात्पुरत्या स्वरुपात असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.