आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात कोकण रेल्वे सीएमडी यांच्यासह अधिकारी -कर्मचाऱ्यांचा सहभाग
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मंगळवारी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
जगाला आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी (दि. २१ जून ) जगभरात विविध स्तरावर साजरा करण्यात आला. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील यात सहभाग घेतला.
कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत बेलापूर येथील मुख्यालयातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी योगासनांच्या विविध प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला.