कोरोनामुळे अनाथ झालेल्या रत्नागिरीतील बालकांशी पंतप्रधानांचा संवाद!
रत्नागिरी : कोव्हिडमुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांशी सोमवारी प्रधानमंत्री देशपातळीवर झालेल्या एका कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. पी. एम. केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप केले.
रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे 7 अनाथ बालके यावेळी उपस्थित होती. त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबूक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील, अध्यक्ष बाल न्याय मंडळ निखील गोसावी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर आदी उपस्थित होते.
तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्वाच स्थान द्या, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना उद्देशून दिला.पी एम केअर फंडामुळे अनेक आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या, त्यामुळे अनेकांचे प्राण आपण वाचवू शकलो यात योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले
कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या मुला-मुलींची संख्या सुमारे 9 आहे. त्यातील 7 जण आज उपस्थित होते त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचे पासबुक आणि पंतप्रधानांचे पत्र अशा साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी बालकांशी संवाद साधला व त्यांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमेबाबत माहिती दिली. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी आस्थापूर्वक पालकांशी चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष करून मला रत्नागिरीला पाठवले आहे, असेही सांगितले.