https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

गाव विकास समितीतर्फे महावृक्षारोपण

0 68

लोवले येथे लावली विविध प्रजातींच्या २ हजार झाडे

संगमेश्वर :
संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे गाव विकास कमिटी लोवले यांच्यावतीने प्रथमच २ हजार विविध प्रजातींची झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. याप्रमाणे ग्रामदेवता व गाव परिसरातील औषधी वनस्पती अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. त्यामागील कमिटीचा उद्देश विविध व्याधीवर वनस्पती औषधे जवळच्या परिसरात निर्माण करणे, औषधी झाडांचे संवर्धन करणे, वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे, जनमाणसाला शुद्ध हवा अशा विविध बाबींसाठी तसेच राष्ट्रप्रेम व पर्यावरण प्रेम याकरिता हा उपक्रम प्रामुख्याने गाव विकास कमिटीने हाती घेतला.

यावेळी उपस्थित सरपंच ऋतुजा कदम, उपसरपंच संजय शिंदे, गाव विकास कमिटी अध्यक्ष प्रदीप महाडिक, सचिव प्रथमेश साळवी, ग्रामसेवक सलोकर, ग्रामपंचायत सदस्य खापरे फटकरे, कृषी सहाय्यक फोपसे, पोलीस पाटील रविकांत पवार, टिडब्ल्यूजे फाउंडेशन पदाधिकारी, नवनिर्माण कॉलेज विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार धनंजय भांगे, ग्रामस्थ देवजी पडये, अंगणवाडी सेविका गाव विकास कमिटी सदस्य तसेच लोवले गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. या उपक्रमास जिल्हा परिषद सदस्य माधवी गीते, सभापती जया माने, वरिष्ठ पत्रकार दिनेश अंब्रे, तळमळीचे कार्यकर्ते विशाल रापटे आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.