चरित्रकार डॉ. धनंजय कीर यांच्या तैलचित्राचे मुंबई विद्यापीठ उपकेंद्रामध्ये अनावरण
डॉ. धनंजय कीर यांच्या जयंतीच्या औचित्याने कार्यक्रम
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपकेंद्र परिसरातील प्रशासकीय वास्तूमध्ये धनंजय कीर यांच्या तैलचित्राचे कुलगुरु प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले.
चरित्रकार कीर यांचे सुपुत्र डॉ. सुनीत कीर, विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रा. रविंद्र कुळकर्णी आणि उपकेंद्र संचालक डॉ. किशोर सुखटणकर यावेळी उपस्थित होते. कीर कुटुंबीयांनी हे तैलचित्र उपकेंद्राला सस्नेह भेट दिले आहे. १ ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यांच्या नामकरण सोहळा पार पडला होता.
चरित्रकार डॉ. धनंजय कीर यांच्या जयंतीचे आणि ‘सामाजिक समता सप्ताहा’चे औचित्य साधून आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रा. रोकडे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार या विषयावर व्याख्यान झाले, त्यावेळी कीर चरित्राचे लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे कीरांच्या आंबेडकर व फुले चरित्रांच्या लेखनासंबंधी भाषण झाले.
मुंबई विद्यापीठाला ‘नॅक’कडून देण्यात आलेल्या अ ++ दर्जा प्रदान करण्यात आला. या सुयशात उपकेंद्राच्या कर्मचारी वर्गाने केलेले योगदान लक्षात घेऊन कुलगुरूंनी उपकेंद्राला दिलेल्या या भेटीच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हे देऊन गौरवले.