https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी वर्षावास प्रवचन मालिका एक पर्वणीच : एन. बी. कदम

0 76

‘वर्षावास’ प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ उत्साहात संपन्न

रत्नागिरी : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडीया तथा भारतीय बौध्द महासभा रत्नागिरी जिल्हा शाखेच्यावतीने ‘वर्षावास’ प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंडणगड तालुक्यातील लोकनेते स्व. गोपिनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे (रविवार दि. ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी) उत्साहात संपन्न झाला. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत बौध्द धम्मात वर्षावासाला बौध्द परंपरा असून हा कालावधी अत्यंत पवित्र असा मानला जातो. आणि माणसाला शीलवान, सदाचारी, सद्वर्तनी बनण्यासाठी वर्षावास राबविण्यात येत असलेली प्रवचन मालिका ही एक पर्वणीच आहे. असे प्रतिपादन एन बी कदम यांनी केले. ते वर्षावास मालिकेच्या सांगता समारंभात बोलत होते.

यापुढे ते म्हणाले, भगवान बुध्दांनी बुध्द झाल्यानंतर वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत एकूण ४५ वर्षावास केले आणि या वर्षावासात मानवाच्या हिताची, सुखाची, कल्याणाची व दुखः मुक्तिची शिकवण सर्व सामान्य मानसापर्यंत स्वतः आणि भिक्षु संघामार्फत पोहचविली. ही ‘वर्षांवास’ची बौध्द परंपरा भारतीय बौध्द महासभेने आदरणीय महाउपासिक मिराताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारत देशात आजही जतन केली आहे. रत्नागिरी जिल्हात देखिल जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत जिल्ह्यात विविध गाव शाखांमधून वर्षावास कार्यक्रमाअंतर्गत समाजातील रूढी परंपरा अविद्या, अद्यान, अंधश्रद्धा अशा विविध विषयांवर भारतीय बौध्द महासभेच्यावतीने प्रवचने देण्यात आली आहेत.

या कार्यक्रमाला जिल्हा कोषाध्यक्ष विजय दौ. कांबळे, कार्यालयीन सचिव प्रदिप जाधव, जनार्दन मोहिते, अ. जा. मोहिते, महिला विभाग उपाध्यक्षा आशाताई कांबळे, महिला सचिव पुजाताई जाधव, जिल्हा संघटक मंगेश पवार , विजय जाधव, हिशेब तपासणीस अनंत जाधव, प्रकाश सुर्वे, महेंद्र कदम, शरणपाल कदम, जयरत्न कदम, तानाजी कांबळे, प्रकाश सुर्वेसह जिल्ह्याभरातून विशेषतः मंडणगड तालुक्यातील अनेक बौद्ध बांधव उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा संस्कार विभागाचे सचिव अल्पेश सकपाळ यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.