https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पादुका दर्शन सोहळा

0 64

नाशिकमध्ये १८ विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप

नाशिक दि. 25 :- सिन्नर नाशिक येथे आज जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा उत्साहात पार पाडला. यावेळी संस्थानच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत १८ विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.
पारपरिक पद्धतीने ढोल – ताशांच्या गजरात वाजत गाजत सिद्ध पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होते. मिरवणुकीनंतर श्रींच्या पादुका संतपिठावर विराजमान झाल्या. त्यानंतर स्वागत व आरती करण्यात आली. त्यानंतर संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत १८ गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. सिन्नर, सातपूर, देवळा, सटाणा, त्र्यंबकेश्वर, पंचवटी, येवला, सुरगाणा, दिंडोरी आदी भागातील विद्यार्थ्यांना नामवंतांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यांनी संस्थानच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या लॅपटॉपचा उपयोग ते आपल्या शैक्षणिक कामासाठी करतील आशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
याच कार्यक्रमात ज. न .म. प्रवचनकार सौ. अरूणाताई पांगारे यांनी प्रवचन झाले
या सोहळ्यास सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, नाशिक महापालिकेचे सभागृह नेते दिनकर पाटील, नाशिक युवा सेने प्रमुख उदय सांगळे, सिन्नरचे तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्या सीमंतीनीताई कोकाटे, सिन्नरच्या नगरसेविका
ज्योती वामणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस
राजाराम मुरकुटे, सिन्नरचे नगरसेवक पंकज मोरे व सोमनाथ पावसे, सिन्नरचे
माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, नाशिक भाजपचे युवा प्रमुख संजय तांबे आदी उपस्थित होते.
सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

सिन्नर नाशिक येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
Leave A Reply

Your email address will not be published.