जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज इन्स्टिट्यूटचा दहावीचा निकाल शंभर टक्के
मधुरा पेठकर ९३.२० टक्के गुण प्राप्त करत प्रशालेमध्ये प्रथम
नाणीज : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटने दहावीच्या परीक्षेत सलग चार वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य (70 टक्क्यांहून अधिक गुण) प्राप्त झाले आहेत.त्यामध्ये कु. मधुरा उमेश पेठकर या विद्यार्थिनीने ९३.२० टक्के गुण प्राप्त करत प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. तर कु. ईश्वरी सुहास शिंदे हिने ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय व अस्मिता अजित खटकूळ ही विद्यार्थिनी 89.80 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. विशेष म्हणजे पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनीच बाजी मारली आहे.या इन्स्टिट्यूटचा बारावीचा विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचा निकाल सलग दोन वर्षे शंभर टक्के लागला आहे. दहावीतील सर्व यशस्वी विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक सर्वांचे परमपूज्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज , परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी कौतुक केले आहे.तसेच संस्थानाचे कार्यकारी अधिकारी विनोद भागवत, विवेक कांबळी, राजन बोडेकर यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूट संपूर्ण मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा असून यामध्ये नाणिजच्या आजूबाजूच्या गावातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची मुले इथे दर्जेदार शिक्षण घेतात. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व बौद्धिक विकासासाठी येथे वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवले जातात .शाळेचे चेअरमन अर्जुन फुलेत्याचबरोबर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक किर्तिकुमार भोसले, मुख्याध्यापिका अबोली पाटील वर्गशिक्षक सूर्याजी होलमुखे, त्रिशा सुवारे, सूर्यदीप धनवडे, अक्षया शिगम,पूजा ताम्हणकर, दीपक पाटील, विशाल माने, महादेव सूर्वें यांच्यासह सर्व शिक्षकांनी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे .