दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांची भावपूर्ण श्रद्धांजली
उरण (विठ्ठल ममताबादे : ज्येष्ठ कामगार नेते, एमआयडीसी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी,मच्छीमारांचे नेते,बी एम टी सीचे कामगार,पनवेल – नवीन पनवेल रोजगार बाजाराचे निर्माते, आगरी शिक्षण संस्थेचे संस्थापक,गोर गरिबांचे कैवारी व जेष्ठ काँग्रेस नेते दिवंगत शाम म्हात्रे यांची पुण्यतिथी दिनांक 9/6/2022 रोजी आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी, पनवेल येथे साजरी करण्यात आली.
श्री रामकृष्ण नेत्रालय सुपर स्पेशालिटी आय केअर तर्फे नेत्र चिकित्सा शिबिराचे तर नु स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सोहम फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर व आर्थोपेडीक तपासणी शिबिराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. नागरिकांनी जनतेनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
दिवंगत स्वर्गीय शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी पुष्पहार आणू नयेत. त्याऐवजी फळ फुल देणारी रोप आणून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा. असे आवाहन स्वर्गीय शाम म्हात्रे यांच्या कन्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी केले होते. त्यानुसार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रोप आणून शाम म्हात्रे यांना वंदन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.दिनांक 12 जून 2022 ते 18 जून 2022 या कालावधीत पनवेल उरण परिसरातील शाळांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.उरण पनवेल परिसरातील एकूण 100 शाळांमध्ये प्रत्येकी शाळेत 5 झाडे /रोप लावण्यात येणार आहेत. वृक्षारोपण करून शाम म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचे श्रुती म्हात्रे यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, कामगार नेते संजय वढावकर, काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अभिजित पाटील, लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील,काँग्रेस युवा नेता अजित म्हात्रे,ओबीसी नेते बाळासाहेब सानप,माजी सरपंच परीक्षित ठाकूर,माया अहिरे,मुख्याध्यापक पंकज भगत,एकनाथ ठोंबरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, कामगार क्षेत्रातील, शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी दिवंगत कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.