राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे मागणी
रत्नागिरी : पर्यटन,उदयोग-धंदे वाढीसाठी नागपूर -मडगाव नागपूर किंवा अमरावती -मडगाव अमरावती सुरू करण्याची राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना सरचिटणीसांची बुलडाणाचे खासदार मा प्रतापराव जाधव यांच्याकडे मागणी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड,गोरेगाव, माणगाव, श्रीवर्धन, रोहा ,इंदापूर, कोलाड,नागोठणे,पेण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा,चिपळूण, गुहागर, खेड,मंडणगड, दापोली सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण,देवगड हे महत्वाचे ठिकाण असून ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत दापोली येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणारी लोकांची प्रवाशांची संख्या मोठी आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर, अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक, नागपूर येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी, वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम,बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मूर्तीजापूर येथील कार्तीकस्वामी मंदिर, कारंजा येथील दत्त गुरूचे स्थान, रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा स्मृतीस्थान, धुळे येथील देवापुर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई,चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात. अशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरणार आहे.
ही गाडी सुरू करण्याची मागणी कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनील उत्तेकर, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास, प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस श्री वैभव बहुतुले, राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार उमाजी माळगांवकर ,पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, प्रवासी सुधीर राठोड, दिपक सोनवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, जळगाव खासदार उन्मेष पाटील, बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव,आमदार निलेश कुलकर्णी, मंगेश दादा कदम, मध्य रेल्वे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी, डिव्हिजनल रिजनल मॅनेजर ऋचा खरे यांच्याकडे केली आहे