रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे झाली तुडुंब!
जिल्ह्यातील ३० हून अधिक धरणे भरली, विहिरिंची देखील पाणी पातळी वाढली
रत्नागिरी : मागील आठ दिवसांपासून मॉन्सून सक्रिय झाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३० हून अधिक धरणे भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे किनारी भागातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
राज्यात सर्वात प्रथम मॉन्सूनने कोकणवर कृपादृष्टी दाखवली असून, अद्यापही पावसामध्ये सातत्य राहिलेले आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात सरासरीपेक्षा अधिक साठा झाला आहे. कोकणातील जलसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी ३० हून अधिक धरणे सध्या भरली असून जिल्हावासियांची पाण्याची चिंता मिटली आहे.