रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच होईल : नीलेश राणे
राजापूर : राजापूर तालुक्यात आलेला महत्त्वाकांक्षी असा रिफायनरी प्रकल्प घालवू देणार नाही. त्यासाठी सज्ज व्हा. कुठल्याही परिस्थीतीत रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यातच मार्गी लागेल, अशा शब्दात भाजप प्रदेश सचिव व रत्नाागिरी -सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यानी ठणकावले.
भाजपच्या वतीने आयोजित या मेळाव्याला भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या समवेत माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, अॅड. विलास पाटणे, संतोष गांगण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी राजापुरात येणार्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता. मात्र, आता परिस्थिती खूर बदलली आहे. प्रकल्पाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भविष्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील प्रत्येक गावातील बेरोजगारांना या प्रकल्पातून रोजगार मिळतील. त्यामुळे या प्रकल्पाच्या बाजूने कोकणी माणसाने राहिले पाहिजे, अशा शब्दात उपस्थित मान्यवरान्नी आपल्या भावना व्यक्त केल्या
यावेळी उपस्थितांमध्ये माजी आमदार प्रमोद जठार भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन अॅड. विलास पाटणे यान्नी मनोगत व्यक्त करताना रिफायनरी प्रकल्प कसा उपयुक्त ठरेल, हे स्पष्ट केले. भाजपच्या वतीने रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आयोजित मेळाव्याला प्रतिसाद लाभला. मोठ्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता राजापूर शहरातील श्रीमंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला.