रेल्वे मार्गावरील कामामुळे ११ मे ची कोकणकन्या आणि ओखा एक्स्प्रेस ‘लेट’ धावणार!
रेल्वे मार्गावरील गर्डरच्या कामाचा वेळापत्रकावर परिणाम
🚆 रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गांवर मडगांव ते माजोरडा दरम्यान अपग्रेडेेशनच्या कामामुळे दि. ११ मे २०२२ ची मडगांव मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस (10112) २५ मिनिटे तर एर्नाकुलम -ओखा (16338) ही तिच्या निर्धारित वेळेपक्षा १ तास २५ मिनिटे उशिरा धावणार आहे.
कोकण रेल्वेच्या मडगांव ते माजोरडा सेक्शन दरम्यान गर्डर चढवण्याचे काम दि. 11 व 12 मे रोजी केले जाणार असल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर काहीसा परिणाम होणार आहे.
दि. 11 मे रोजीच्या अप कोकणकन्या तसेच ओखा एक्स्प्रेसने प्रवासाचे नियोजन केलेल्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.