काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आश्वासन
मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, निवृत्तीवेतन व त्यांच्या सेवाशर्ती सुधारण्याची मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. या मागण्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करून न्याय देण्याचे आश्वासन पटोले यांनी दिले आहे.
केरळ, दिल्ली, आंध्र प्रदेशातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचा-यांना मानधन मिळावे. सेवानिवृत्तीनंतर मानधनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून राज्य सरकारने या मागण्यांचा तातडीने विचार करावा तसेच निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे या संदर्भात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, कामगार नेते विश्वास उटगी, किशोर केदार, यांच्या शिष्टमंडळाने नाना पटोले यांची टिळक भवन येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष नसीम खान हेही उपस्थित होते. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देऊ असे पटोले म्हणाले.