Ultimate magazine theme for WordPress.

अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0 38

रत्नागिरी :अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी कोकण बोर्डाच्या इ. १२
वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
महाविद्यालयाच्या राधाबाई शेटये सभागृहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी
व्यासपीठावर र. ए. सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह श्री. श्रीकांत
दुदगीकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री. आनंद देसाई, संस्थेचे
विश्वस्त व शालेय समिती  सदस्य श्री. विवेक भावे, नियामक मंडळ सदस्य श्री. मनोज
पाटणकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल्दत्त कुलकर्णी, कनिष्ठ
महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. अनिल उरूणकर, पर्यवेक्षक श्री. चिंतामणि दामले,
एमसीव्हीसी विभागाचे पर्यवेक्षक श्री. माधव पालकर व  कला
विभागप्रमुख कानिटकर सर आणि वाणिज्य विभाग प्रमुख तारगावकर मॅडम उपस्थित
होत्या.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. चिंतामणि दामले यांनी
केले. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील सर्व शाखांमधील यशस्वी
विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महाविद्यालयातील शिक्षकांचा खूप
मोठा वाटा व संस्थेचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यानी
मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल कला विभाग ९२.५६ %, वाणिज्य
विभाग ९९.१४%, विज्ञान विभाग ९१.०२% तर एमसीव्हीसी विभागाचा निकाल
१०० % लागला. यावेळी कोकण बोर्डाच्या इ. १२वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन
केलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा
सत्कार करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक शाखांनिहाय
पुढीलप्रमाणे- कला शाखेतील कु. कल्पजा जोगळेकर, कु. मीरा काळे, कु. अंकिता जाधव,
वाणिज्य शाखेतील कु. सई खानोलकर, कु. रुद्रान्श लोवलेकर, कु. लिना खामकर व
विज्ञान शाखेतील कु. रुची भाटकर, कु. यशराज राणे, कु. अनुपमा कुलकर्णी तर
एमसीव्हीसी विभागातील कु. रत्नाकर चव्हाण, कु. तन्वी कळंबटे, कु.
वैष्णवी कालकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच ज्या विद्यार्थ्यानी कोकण बोर्डाच्या इ. १२ वीच्या परीक्षेत विषयामध्ये
पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. ह्यामध्ये
संस्कृत विषयात एकूण २१ विद्यार्थ्यानी, अकाऊंटन्सी मध्ये ४ विद्यार्थ्यानी तर
गणित विषयात एका विद्यार्थ्याने व एम.सी.व्ही.सी. शाखेतील एका विद्यार्थ्याने  पेपर-
III मध्ये १०० गुण प्राप्त केले. ह्या सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात कु. कल्पजा जोगळेकर, कु. सई खानोलकर, कु. लिना
खामकर, कु. रुची भाटकर, कु. रत्नाकर चव्हाण या विद्यार्थ्यानी आपले
मनोगत व्यक्त केले. त्यावेळी आपल्या यशामध्ये पालकांचा व महाविद्यालयातील
शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे विशेषत्वाने नमूद केले.
सदर कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य
श्री. अनिल उरूणकर यांनी कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्येदेखील
महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागल्याबद्दल सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व सर्व
शिक्षकांचे अभिनंदन केले.

तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल्दत्त कुलकर्णी यांनी आपल्या
मनोगतात सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी, पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्यान
सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री. आनंद देसाई यांनी आपले
मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यानी मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन करून त्यांना
करियरच्या नवीन वाटा शोधण्यासाठी आवाहन केले व संस्थेच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा
परीक्षा विभागामार्फत खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील असे सांगितले. पुढील
वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना र. ए. सोसायटीचे कार्यवाह
श्री. सतीशजी शेवडे यांनी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
राखल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थी पूरक मार्गदर्शन करण्याचे काम
आपल्या शिक्षकांनी केले व सदर निकाल हा त्याचेच यश असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुणा नागवेकर तर आभार प्रदर्शन एमसीव्हीसी
विभागाचे पर्यवेक्षक श्री. माधव पालकर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.